10/22/11
मिल्क पावडर पासुन बनवलेले गुलाब जामुन
लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
२ कप : मिल्क पावडर
१/२ कप : रवा किंवा मैदा
१ चमचा : वेलची पावडर
१ चमचा : खायचा सोडा
१ चमचा : मोहन [गरम तुप्/तेल]
१ कप : दुध
१/२ चमचा : मीठ
पाकासाठी :
१-१/२ कप :साखर
१ कप : साखर भिजे पर्यंत पाणी
पाक कसा करावा? http://www.maayboli.com/node/6445 या धाग्या च्या मदतीने केला.
क्रमवार पाककृती:
१.सर्व प्रथम मिल्क पावडर ,रवा किंवा मैदा ,वेलची पावडर , खायचा सोडा,मोहन [गरम तुप्/तेल],मीठ मावेल ईतक्या दुधात मळुन घ्या.[दुध १ कप पेक्षाही कमी लागेल.]
२. आता मळलेल्या कणीकेचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. तोपर्यंत एका कढईत तळणी साठी तेल तापत ठेवा.आणी पाक बनवुन घ्या. [वरील दिलेल्या लिंक प्रमाणे मी बनवला ]
३. बनवलेले गोळे मंद आचेवर खरपूस होईल अशी तळुन घ्या.
४.सोनेरी रंग आला की एका ताटात काढुन घ्या. थोडे थंड झाले की पाकात सोडा.
वाढणी/प्रमाण:
अंदाजे ५ जण
अधिक टिपा:
१ . रवा किंवा मैदा १ चमचा घेतला तरी चालेल्..जितका कमी तितके गुलाब जामुन फुगतील
२. तळताना गॅस मंद आचेवरच असला पाहीजे नाही तर वरुन झालेले वाटतात आणी आतुन कच्चे !
३. वेलची पावडर ला ओपशन दुसरा कोणताही ईसेन्स घेउ शकतो.
४. लांबट गुलाब जामुन साठी जरा घट्ट पिठ असावे नाही तर तळताना तुटु शकतात.
५. मोहन साठी शकतो तुपच वापरावे,तेलाने खुशखुशीत पणा येत नाही
६. गोल करताना तयार झालेले गोळे एका ओल्या कपडा खाली झाकुन ठेवा.म्हणजे सुरकुत्या पडणार नाहीत.