Showing posts with label पाककृती. Show all posts
Showing posts with label पाककृती. Show all posts

10/22/11

मिल्क पावडर पासुन बनवलेले गुलाब जामुन

लागणारा वेळ: ४५ मिनिटे लागणारे जिन्नस: २ कप : मिल्क पावडर १/२ कप : रवा किंवा मैदा १ चमचा : वेलची पावडर १ चमचा : खायचा सोडा १ चमचा : मोहन [गरम तुप्/तेल] १ कप : दुध १/२ चमचा : मीठ पाकासाठी : १-१/२ कप :साखर १ कप : साखर भिजे पर्यंत पाणी पाक कसा करावा? http://www.maayboli.com/node/6445 या धाग्या च्या मदतीने केला. क्रमवार पाककृती: १.सर्व प्रथम मिल्क पावडर ,रवा किंवा मैदा ,वेलची पावडर , खायचा सोडा,मोहन [गरम तुप्/तेल],मीठ मावेल ईतक्या दुधात मळुन घ्या.[दुध १ कप पेक्षाही कमी लागेल.] २. आता मळलेल्या कणीकेचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. तोपर्यंत एका कढईत तळणी साठी तेल तापत ठेवा.आणी पाक बनवुन घ्या. [वरील दिलेल्या लिंक प्रमाणे मी बनवला ] ३. बनवलेले गोळे मंद आचेवर खरपूस होईल अशी तळुन घ्या. ४.सोनेरी रंग आला की एका ताटात काढुन घ्या. थोडे थंड झाले की पाकात सोडा. वाढणी/प्रमाण: अंदाजे ५ जण अधिक टिपा: १ . रवा किंवा मैदा १ चमचा घेतला तरी चालेल्..जितका कमी तितके गुलाब जामुन फुगतील २. तळताना गॅस मंद आचेवरच असला पाहीजे नाही तर वरुन झालेले वाटतात आणी आतुन कच्चे ! ३. वेलची पावडर ला ओपशन दुसरा कोणताही ईसेन्स घेउ शकतो. ४. लांबट गुलाब जामुन साठी जरा घट्ट पिठ असावे नाही तर तळताना तुटु शकतात. ५. मोहन साठी शकतो तुपच वापरावे,तेलाने खुशखुशीत पणा येत नाही ६. गोल करताना तयार झालेले गोळे एका ओल्या कपडा खाली झाकुन ठेवा.म्हणजे सुरकुत्या पडणार नाहीत.

1/31/11

डिंकाचे लाडु

लागणारा वेळ: १.५ तास

लागणारे जिन्नस: 1.खारीक :१ किलो 2.खोबरे:१ किलो 3.डिंक :२०० ग्रॅम 4.साखर:१/२ किलो 5.गव्हाचे पिठ:३/४ किलो 6.काजु:१ वाटी 7.बदाम:१ वाटी 8.तुप:३/४ किलो 9.ओवा:५० ग्रॅम 10.जायफळः१ 11.सुंठ:५० ग्रॅम

क्रमवार पाककृती: डिंक्,खोबरे,साखर,खारीक बारीक करुन घ्यावा. तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन एकत्र करावे. डिंक तुपात तळुन घ्यावा तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन साखर,काजु,बदाम,जायफळ,सुंठ एकत्र करावे. एका मोठ्या कढ्ईत सर्व पदार्थ एकत्र करुन मळावे व लाडु बांधुन घ्यावेत.

वाढणी/प्रमाण: २० लाडु

अधिक टिपा: डायबेटीक लाडु कारायचे असतील तर साखर कमी करुन ५० ग्रॅम मेथ्या घालाव्यात. खारीक बिया काढुन बाहेरुनच बारीक करुन आणावी/ खारीक बिया काढुन चाकुने कापावी व नंतर मिक्सर मधुन बारीक करावी.

माहितीचा स्रोत: सासुबाई-माझी आई

झट्पट -खंमग (शेगंदाण्याची) चटणी

लागणारा वेळ: ५ मिनिटे
लागणारे जिन्नस: १ वाटी : शेंगदाण्याचा तयार कुट १ चमचा : लाल तिखट् / मिर्ची पुड १/२ चमचा : मिठ २ चमचे : तेल २-३ पकळ्या : लसुन

क्रमवार पाककृती: छोट्या कढईत /कडल्यात तेल गरम करायला ठेवायची,तोपर्यंत लसुन ठेचुन घ्यायचा. शेंगदाण्याचा कुट्,तिखट्,मिठ एकत्र करुन ठेवायचा.गरम तेलात लसुन परतुन घ्यायचा.मग शेंगदाण्याचे एकत्र सारण टाकायचा. चटणी तयार!!

वाढणी/प्रमाण: ३
माहितीचा स्रोत: श्रीराम