लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कोणत्याही फळ भाज्या [गाजर, गवार, फरसबी,बटाटा,वांग्,वटाणे],
२ वाटी सुटा शिजलेला भात
१ वाटी तुप / तेल /डालडा
१ वाटी शेंगदाणे
मसाला साहीत्यः
तव्यावर भाजलेला कांदा [२ कांदे],
१ दालचीनी,
तमालपत्री,
१ चमचा जीरे,
ओलं खोबरं,
१ वाटी कोथींबीर.
१ वाटी दही/ साय,१ वाटी दुध.
१/२ चमचा आलं,
१/२ लसुन ,
१/२ कडीपत्ता,
१ लिंबु,
१ मसाला वेलदोडा,
१ चमचा तीखट,
१ चमचा गरम मसाला [एवरेस्ट]
चवीनुसार मीठ
क्रमवार पाककृती:
१. २ वाटी भात जीरे आणी तमालपत्री सुटा होई पर्यंत शिजवुन घ्या.
२.भाजलेला कांदा,जीरे, कोथींबीर,तमालपत्री,ओलं खोबरं,दालचीनी, लिंबु,१/२ कडीपत्ता,लसुन ,चमचा आलं,वाटी दही ,दुध, मसाला वेलदोडा एकत्र करुन तुपात/ तेलात / डालड्यात परता .
३.वरील मिश्रणात गरम मसाला, मीठ आणी तीखट एकत्र करा.
४.शिजलेला भात आणी तयार मिश्रण एकत्र करुन ५ min वाफलवा...
या पुलावा सोबत
सांबार, भाजलेला पापड , आंब्याचे लोणचे , सॉस , कारळाची चटणी
वाढणी/प्रमाण:
४ जणं