लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
1.खारीक :१ किलो
2.खोबरे:१ किलो
3.डिंक :२०० ग्रॅम
4.साखर:१/२ किलो
5.गव्हाचे पिठ:३/४ किलो
6.काजु:१ वाटी
7.बदाम:१ वाटी
8.तुप:३/४ किलो
9.ओवा:५० ग्रॅम
10.जायफळः१
11.सुंठ:५० ग्रॅम
क्रमवार पाककृती:
डिंक्,खोबरे,साखर,खारीक बारीक करुन घ्यावा.
तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन एकत्र करावे.
डिंक तुपात तळुन घ्यावा
तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन साखर,काजु,बदाम,जायफळ,सुंठ एकत्र करावे.
एका मोठ्या कढ्ईत सर्व पदार्थ एकत्र करुन मळावे व लाडु बांधुन घ्यावेत.
वाढणी/प्रमाण:
२० लाडु
अधिक टिपा:
डायबेटीक लाडु कारायचे असतील तर साखर कमी करुन ५० ग्रॅम मेथ्या घालाव्यात.
खारीक बिया काढुन बाहेरुनच बारीक करुन आणावी/ खारीक बिया काढुन चाकुने कापावी व नंतर मिक्सर मधुन बारीक करावी.
माहितीचा स्रोत:
सासुबाई-माझी आई