लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी : शेंगदाण्याचा तयार कुट
१ चमचा : लाल तिखट् / मिर्ची पुड
१/२ चमचा : मिठ
२ चमचे : तेल
२-३ पकळ्या : लसुन
क्रमवार पाककृती:
छोट्या कढईत /कडल्यात तेल गरम करायला ठेवायची,तोपर्यंत लसुन ठेचुन घ्यायचा.
शेंगदाण्याचा कुट्,तिखट्,मिठ एकत्र करुन ठेवायचा.गरम तेलात लसुन परतुन घ्यायचा.मग शेंगदाण्याचे एकत्र सारण टाकायचा.
चटणी तयार!!
वाढणी/प्रमाण:
३
माहितीचा स्रोत:
श्रीराम