1/31/11

हैद्राबादी पुलाव

लागणारा वेळ: २० मिनिटे

लागणारे जिन्नस: कोणत्याही फळ भाज्या [गाजर, गवार, फरसबी,बटाटा,वांग्,वटाणे], २ वाटी सुटा शिजलेला भात १ वाटी तुप / तेल /डालडा १ वाटी शेंगदाणे

मसाला साहीत्यः तव्यावर भाजलेला कांदा [२ कांदे], १ दालचीनी, तमालपत्री, १ चमचा जीरे, ओलं खोबरं, १ वाटी कोथींबीर. १ वाटी दही/ साय,१ वाटी दुध. १/२ चमचा आलं, १/२ लसुन , १/२ कडीपत्ता, १ लिंबु, १ मसाला वेलदोडा, १ चमचा तीखट, १ चमचा गरम मसाला [एवरेस्ट] चवीनुसार मीठ

क्रमवार पाककृती: १. २ वाटी भात जीरे आणी तमालपत्री सुटा होई पर्यंत शिजवुन घ्या. २.भाजलेला कांदा,जीरे, कोथींबीर,तमालपत्री,ओलं खोबरं,दालचीनी, लिंबु,१/२ कडीपत्ता,लसुन ,चमचा आलं,वाटी दही ,दुध, मसाला वेलदोडा एकत्र करुन तुपात/ तेलात / डालड्यात परता . ३.वरील मिश्रणात गरम मसाला, मीठ आणी तीखट एकत्र करा. ४.शिजलेला भात आणी तयार मिश्रण एकत्र करुन ५ min वाफलवा...

या पुलावा सोबत सांबार, भाजलेला पापड , आंब्याचे लोणचे , सॉस , कारळाची चटणी

वाढणी/प्रमाण: ४ जणं

डिंकाचे लाडु

लागणारा वेळ: १.५ तास

लागणारे जिन्नस: 1.खारीक :१ किलो 2.खोबरे:१ किलो 3.डिंक :२०० ग्रॅम 4.साखर:१/२ किलो 5.गव्हाचे पिठ:३/४ किलो 6.काजु:१ वाटी 7.बदाम:१ वाटी 8.तुप:३/४ किलो 9.ओवा:५० ग्रॅम 10.जायफळः१ 11.सुंठ:५० ग्रॅम

क्रमवार पाककृती: डिंक्,खोबरे,साखर,खारीक बारीक करुन घ्यावा. तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन एकत्र करावे. डिंक तुपात तळुन घ्यावा तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन साखर,काजु,बदाम,जायफळ,सुंठ एकत्र करावे. एका मोठ्या कढ्ईत सर्व पदार्थ एकत्र करुन मळावे व लाडु बांधुन घ्यावेत.

वाढणी/प्रमाण: २० लाडु

अधिक टिपा: डायबेटीक लाडु कारायचे असतील तर साखर कमी करुन ५० ग्रॅम मेथ्या घालाव्यात. खारीक बिया काढुन बाहेरुनच बारीक करुन आणावी/ खारीक बिया काढुन चाकुने कापावी व नंतर मिक्सर मधुन बारीक करावी.

माहितीचा स्रोत: सासुबाई-माझी आई

झट्पट -खंमग (शेगंदाण्याची) चटणी

लागणारा वेळ: ५ मिनिटे
लागणारे जिन्नस: १ वाटी : शेंगदाण्याचा तयार कुट १ चमचा : लाल तिखट् / मिर्ची पुड १/२ चमचा : मिठ २ चमचे : तेल २-३ पकळ्या : लसुन

क्रमवार पाककृती: छोट्या कढईत /कडल्यात तेल गरम करायला ठेवायची,तोपर्यंत लसुन ठेचुन घ्यायचा. शेंगदाण्याचा कुट्,तिखट्,मिठ एकत्र करुन ठेवायचा.गरम तेलात लसुन परतुन घ्यायचा.मग शेंगदाण्याचे एकत्र सारण टाकायचा. चटणी तयार!!

वाढणी/प्रमाण: ३
माहितीचा स्रोत: श्रीराम